Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar News : हा प्रश्न आहे का? काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार पत्रकारांवर चिडले

Sharad Pawar News : हा प्रश्न आहे का? काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार पत्रकारांवर चिडले

| Updated on: Mar 15, 2025 | 11:10 AM

Sharad Pawar Press Conference : शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या काही प्रश्नावर शरद पवार चिडलेले बघायला मिळाले.

बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो. आज जी अवस्था आहे. ती कधीच नव्हती. सर्व घटकांना घेऊन जाणारा असा जिल्हा हा माझा अनुभव आहे. मी स्वत: त्या भागावर लक्ष देत होतो. मी बीडबाबत निर्णय घेतले आहेत. सहा सहा सदस्य तिथून आमदार म्हणून निवडून आणले आहेत. बीडमध्ये काही दुष्परिणाम दिसत आहेत. माझं स्वच्छ मत आहे कोण आहेत याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, त्यांच्या विरोधात सख्त धोरण आखावं. बीडला वैभव प्रयत्न करून देण्याचा करावा, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हंटलं आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, निवडणुका होत असतात. लोक भेटत असतात. पण मी व्यक्तीश: काय करायचं ते ठरवलं नाही. हे सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सख्त कारवाई करावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. मल्हार मटण हा हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का? राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही? असा उलट सवाल यावेळी शरद पवार यांनी केला आहे. यावेळी पत्रकारांनी जय पवार यांच्या साखरपुड्याबद्दल विचारल्यावर शरद पवार पत्रकारांवर चिडलेले बघायला मिळाले. हा काय प्रश्न आहे. काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.

Published on: Mar 15, 2025 11:10 AM