शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके ?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरु असून अनेक ठिकाणी मारामारी, धमकी देणे, ईव्हीएम मशिन तोडणे असे प्रकार घडले आहेत. वर्ध्यात शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. निलेश कराळे यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत निलेश कराळे यांना मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपण गावाहून मतदान करुन कुटुंबासोबत परत येत असताना उंबरी गावात एका बुथवर थांबलो. तेथे आमदार पंकज भोयर यांच्या बुथजवळ आठ लोक बसेल होते. तिथे बाकावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील लॅपटॉप घेऊन बसले होते. आपण पोलिसांना कॉल केला. त्यानंतर भाजपाच्या लोकांना आपल्याला मारहाण केल्याचे ते म्हणाले. आपली पत्नीमध्ये पडली तिलाही मारहाण केल्याचे ते म्हणाले.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती

