कुंभमेळ्यातील गंगाजल vs संध्याजल… ‘संध्याकाळी साडेसात नंतरच पाणी चालतं का?’ राज ठाकरेंवर राणेंची जहरी टीका
संध्याकाळी साडेसात नंतरच पाणी कसं चालतं असं म्हणत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. नदी प्रदूषणावरून राज ठाकरेंनी गंगा जलवरून केलेली टीका आता संध्या जलपर्यंत पोहोचली आहे.
साडेसात नंतरचं पाणी घेताना खाज येत नाही का? असा सवाल भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे. दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून सवाल उपस्थित केले होते. त्यावरून आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत राणे यांनी थेट संध्याकाळच्या पाण्याचा विषय छेडला. ‘सोशल मीडियावर मी बघतोय माणसं तिथे आलेल्या बायका गंगेत अंग घासताय आणि बाळा नांदगावकर गंगेचं पाणी मला प्यायला देताय, कोण पिणारं असलं पाणी? श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये. या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतन बाहेर या जरा…. राज कपूर यांनी एक चित्रपट काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ… पण गंगा काही साफ व्हायला तयार नाही.’, असं राज ठाकरे म्हणाले तर नितेश राणेंनी यावर पलटवार केलाय.
‘फक्त आमच्या गंगा जलवरचं प्रॉब्लेम… मी जाऊन आलेलो, आत्तापर्यंत मला काही त्रास झाला नाही. फक्त आमच्या हिंदू धर्माची बदनामी करायची हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहायचं हा एक कलमी कार्यक्रम सुरूये. बकरीईदच्या काळात जे बकरी जेव्हा कापतात ते पाणी काय हातातून टाकून काय बाजूला करतात काय? तेव्हा कोण काय बोलताना दिसलं नाही. हिंदूंनी असंच केलं पाहिजे आमचा श्रद्धेचा विषय आहे. जे बोलयचं ना मग अन्य धर्मांना पण बोलून दाखवा त्यांना बोलण्याची हिंमत करा त्यांच्या गोष्टी थांबवा ज्या काही हिंदू समाज आणि हिंदू राष्ट्र म्हणून आम्ही या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या प्रत्येक सण आम्ही अभिमानानेच साजरा करणार कोणाचीही आम्हाला फिकीर करायची गरज नाही’, असं राणे म्हणाले.