Nana Patole | अनिल देशमुख प्रकरणात काहीही निष्पन्न होणार नाही : नाना पटोले
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी मध्यरात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर शरसंधान साधलं आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने सोमवारी मध्यरात्री अटक केली. देशमुख यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशमुख यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर शरसंधान साधलं आहे. नेत्यांना अटक करुन सरकार पाडता येईल, या गैरसमजात भाजपवाले आहेत. पण मला त्यांना सांगायचंय, तुम्ही कितीही प्रयत्न करा, महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही, असं नाना पटोले यांनी ठासून सांगितलं. “केंद्रातील भाजपचं सरकार सर्वच क्षेत्रात नापास झालंय. त्यामुळे या अपयशाला बगल देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातंय. ज्यांनी आरोप केले ते परमवीर सिंग गायब आहे. अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक, अजित पवारांसंबंधी संपत्तीच्या अफवा ही भाजपकडून मुद्दामून सगळं सुरु आहे. पण यामुळे सरकार आणखी मजबूत होईल” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
Published on: Nov 02, 2021 03:30 PM
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा

