Laxman Hake : जरांगेंच्या आडून सरकार उलथवण्याच्या प्रयत्न, अजितदादांच्या आमदार, खासदारांबाबत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा वापर करून सरकार उलथण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. हाके यांच्या मते, अजित पवार यांचे काही आमदार या प्रयत्नात सहभागी होते. हाके यांनी याबाबत पुरावे असल्याचा दावा केला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या नाहीतर सरकार उथवून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील दिला होता. तर मनोज जरांगे पाटील यांच्या आडून सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. नुकतीच लक्ष्मण हाकेंनी पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी हा आरोप केलाय.
‘देवेंद्र फडणवीसांचा सरकार उलथून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल. पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदा- खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसेच अजित दादा पवारांचे आमदार-खासदार त्यामध्ये सामील आहेत’, असा खळबळजनक आरोप हाकेंनी केलाय. इतकंच नाहीतर मनोज जरांगे पाटील नावाच्या या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करतायेत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायेत, असा हल्लाबोल देखील लक्ष्मण हाके यांनी केलाय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

