Vijay Wadettiwar : आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू… पहिली फाशी जरांगेला द्या, वडेट्टीवार का भडकले?
विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढताना जीव गमावण्याची तयारी दर्शवली आहे. मनोज जरांगेंवर गंभीर आरोप करत, "आमचा जीव गेल्यावर जरांगेंना फाशी द्या," असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारने जरांगेंवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना जीव गेला तरी चालेल, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत वडेट्टीवार म्हणाले की, “आमचा जीव गेल्यावर जरांगेंना फाशी द्या, आम्ही चिठ्ठी लिहू.” यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी जरांगेंवर तीव्र शब्दात हल्ला चढवला.
“आता करू देत ना, काय करेल तो मारूनच टाकेल ना मनोज जरांगे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल. जीव घेणारा कोण आहे ते आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू. जरांगेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर. पहिली फाशी त्याला द्या.” असे त्यांनी म्हटले. पुढे ते म्हणाले, “तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना? तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल. गुन्हे दाखल करतील आणि फासावर चढवतील ना.” त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठी खळबळ उडाली आहे.
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप

