राजव्यापी संपांची झळ शाळेलाही; शिक्षकच नाहीत, विद्यार्थी घरात
या संपामध्ये विनाअनुदानित शाळा त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजचे सगळे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत
कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आज राज्यात सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत राजव्यापी संप सुरू आहे. याचा थेट परिणाम शहरासह ग्रामीण भागातही पहायला मिळत आहे. या संपामध्ये विनाअनुदानित शाळा त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजचे सगळे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कनेरी यासारख्या गावातही शाळांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. कनेरी हायस्कूलमध्ये संपामुळे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आले नसल्याने विद्यार्थीही आलेले नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळतोय. तर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 80 हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले असून महापालिका क्षेत्रातील जवळपास साडेतीन हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनीही यात सहभाग घेतला आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

