अखेर तोडगा निघाला? कांदा व्यापारी उद्या करणार ‘येथे’ कांदा लिलाव; तिसऱ्या दिवशीही कांदा लिलाव बंद
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शॉक दिला होता. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी यांनी आंदोलन पुकारले होते. तर कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारला होता.
नाशिक : 23 ऑगस्ट 2023 | गेल्या तीन एक दिवसापासून कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावरून जोरदार आंदोलन पुकारले होते. तर आंदोलनाचा पवित्रा घेत रास्ता रोको देखील केलं होतं. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने यावर तोडगा काढण्यासह शेतकऱ्यांच्या भावना केंद्रापर्यंत पोहचवू असे म्हटलं होतं. तर यावरून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. ज्यानंतर केंद्राने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. तर दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहिर केला. तसेच त्याचा दर देखील घोषित केला. यानंतर आता नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतीत पुन्हा एखदा कांदा लिलाव होणार आहे. तर केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क विरोधात पुकारलेला लिलाव बंद आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. त्यामुळे उद्यापासून कांद्याचा लासलगाव येथे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहे. याबाबत बाजार समितीतील कार्यालयात सभापती, संचालक व कांदा व्यापाऱ्यांची बैठकीत निर्णय झाला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

