Pakistan Video : पाक आर्मी, राजकारणी अन् अतिरेक्यांची मिलीभगत, दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ समोर
पाकिस्तानी अतिरेक्याच्या जनाजामध्ये पाक लष्कराचे टॉप अधिकारी सहभागी होते, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. अबू जुंदालच्या जनाजामध्ये काही जागतिक दहशतवादी सुद्धा सहभागी होते. मुरीदके एअर स्ट्राईकमध्ये लष्करी दह्याबाचा कमांडर अबू जुंदालचा खात्मा झाला होता.
अतिरेक्याच्या जनाजात पाकचे टॉप मिलिटरी अधिकारी सहभागी झाले असून पाक राष्ट्रपती, मुनीरकडूनही त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. मुरीदकेमधल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात लष्करी तय्यबाचा टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल मारला गेला. अबू जुंदाल हा मुरीदकेच्या मरकज ए तैय्यबाचा प्रमुख होता. मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीने मानवंदना दिली. शासकीय इतमामात अतिरेकी अबू जुंदालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी आणि राजकारणी उपस्थित होते. यावेळी लष्करी तैय्यबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रौफचीही उपस्थिती होती. अबू जुंदालच्या दफनविधी वेळी हजर असणाऱ्या सर्वांची नावे समोर आली आहेत.
पाक लष्कर, राजकारणी अन् दहशतवाद्यांची मिलीभगत
जनाजात सर्वात पुढे माईकच्या समोर उभा असलेला व्यक्ती आहे दहशतवादी अब्दुल रौफ. अब्दुल रौफला अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. दहशतवादी अब्दुल रौफच्या उजव्या बाजूला उभे असलेला व्यक्ती आहे. पाकिस्तान लष्कराचा लेफ्टनंट जनरल फैयाद हुसेन शहा. फैयाद हुसेन शहाच्या बाजूला उभी असलेली दुसरी व्यक्ती आहे पाकिस्तानचा ब्रिगेडियर मोहम्मद शब्बीर. अब्दुल रौफच्या डाव्या बाजूला उभी असलेली व्यक्ती आहे पाकचा मेजर जनरल राव इमरान सरताज. राव इमरान सरताजच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती आहे, पाकच्या पंजाब प्रांताचा इन्स्पेक्टर जनरल उस्मान अनवर. त्याच्या शेजारी उभा आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला आमदार मलिक शोएब अहमद. पाकिस्तानच्या लष्कराचे अनेक अधिकारी आणि इतरही राजकारणी या जनाजात होते.