AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतर अतिरेक्यांच्या मोठा अड्ड्याची बघा अवस्था

Operation Sindoor : पाकमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतर अतिरेक्यांच्या मोठा अड्ड्याची बघा अवस्था

| Updated on: May 07, 2025 | 4:54 PM

मरकज सुभान अल्लाह या मदरशात 600 जणांच्या राहण्याची व्यवस्था आहे. पाकिस्तान सरकारच्या मदतीने या मदरशाची उभारणी करण्यात आली आहे. भारतीय सीमेपासून हे पाकिस्तानात 100 किलोमीटर आतमध्ये आहे. जैश ए मोहम्मदचे आतमध्ये अतिरेकी इथेच राहतात.

भारताने पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक केलेला आहे. आणि ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानवर नऊ मोठे हल्ले केले गेलेत. अत्यंत टार्गेटेड असे हे हल्ले असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ, ट्रेनिंग सेंटर, जैश ए मोहम्मदचे मुख्यालय, लष्कर ए तोयबाचा महत्त्वाचा तळ असे अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. तर पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त आतंकवादी तळांना यावेळी लक्ष्य करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ऑपरेश सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मसूद अजहर आणि हाफिज सईदची ९ ठिकाणं उद्धवस्त कऱण्यात आली. भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहावलपूरमध्ये मसूद अजहरच्या तळावर होता. बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदच हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं. ते उद्ध्वस्त करण्यात आलंय.

पाकिस्तानच्या बहावलपुरमध्ये 15 एकर परिसरात मरकज सुभान अल्लाह आहे. हे जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेच मुख्यालय आहे. पुलवामातील अतिरेक्यांनी याच मुख्यालयात प्रशिक्षण घेतलं होतं. याच ठिकाणी जैश ए मोहम्मद मोरक्या मौलाना मसूद अजहर राहतो. इतर मोठे अतिरेकी आणि जैशचे टॉप कमांडर इथेच राहतात. जैश ए मोहम्मदकडून इथे अतिरेक्यांना लष्करी आणि धार्मिक प्रशिक्षण दिलं जातं. मसूद अजहरचा भाऊ युसुफ अजगर इथेच राहतो. युसुफ अजगर हा जैश ए मोहम्मदच्या शस्त्र विभागाचा प्रमुख आहे.

Published on: May 07, 2025 04:54 PM