Operation Tiger : राज्यात शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’चा सपाटा; माजी आमदार, पदाधिकारी हाती घेणार ‘धनुष्य’, कोकणानंतर आता कुठं खिंडार?
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील माजी आमदार सुजित मिणचेकर हे एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसात सुजित मिणचेकर यांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
कोकणानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची तयारी सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील माजी आमदार सुजित मिणचेकर हे एकनाथ शिंदे यांच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसात सुजित मिणचेकर यांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेना पक्ष फूटीनंतर सुजित मिणचेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत संधी न मिळाल्याने सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. हातकणंगलेचे माजी आमदार आणि गोकूळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
तीन वर्षांपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करत तब्बल ४० आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यादरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर हे देखील एकनाथ शिंदेंसोबत जातील असा विश्वास होता. मात्र त्यावेळी त्यांनी अडचणीच्या काळात उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकीपर्यंत माजी आमदार सुजित मिणचेकर हे शिवसेना ठाकरे गटातच राहिले. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द ठाकरेंनी दिला होता. पण ऐनवेळी तो शब्द फिरवल्याने ते उमेदवारी न मिळाल्याने माघारीच्या एक दिवस आधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करत त्यांनी निवडणूक लढवली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

