Somnath Suryawanshi : छगन भुजबळांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट
Chhagan Bhujbal Meet Somnath Suryawanshi Family : परभणी हिंसाचार घटनेत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या गावी जात सांत्वनपर भेट घेतली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची बाजू मांडली होती. त्यानंतर दबाव वाढल्याने 3 पोलिसांचं निलंबन देखील करण्यात आलं. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने संशय उपस्थित करून कारवाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी सांत्वनपर भेट देत त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.
Published on: Mar 09, 2025 02:55 PM
Latest Videos

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
