CM Devendra Fadnavis : ‘.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही’, मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला टोला
CM Devendra Fadnavis - NCP Leader Jayant Patil : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. फडणवीस सभागृहात गुंतवणुकीबद्दल भाषण करत असताना जयंत पाटील यांनी टिपणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात आज गुंतवणुकीची माहिती देत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टिपणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला आहे. जयंत पाटलांनी तरी चुकीची माहिती देऊ नये. रोहित पवार, वरुण सरदेसाई बोलले असते तर समजून घेतलं असतं. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात गुंतवणुकीची माहिती दिली यावेळी ते बोलत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टिपणी केली त्यावर फडणवीस यांनी, तुम्ही चुकीच्यावेळी चुकीच्या ठिकाणी असता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य वेळी योग्य लोकांसोबत सांगितल्या पाहिजे. जयंत पाटील यांनी अशी चुकीची माहिती देऊ नये. रोहित पवार, वरुण सरदेसाई असं बोलले असते तरी समजून घेतलं असतं. पण जयंत पाटलांकडून अशी चूक अपेक्षित नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
