AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : संरक्षण मंत्री म्हणाले... ते अवघे 22 मिनिटं अन् पाकड्यांचे 9 अड्डे नेस्तनाभूत; लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा

Operation Sindoor : संरक्षण मंत्री म्हणाले… ते अवघे 22 मिनिटं अन् पाकड्यांचे 9 अड्डे नेस्तनाभूत; लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा

| Updated on: Jul 28, 2025 | 2:59 PM
Share

Debate On Operation Sindoor In Lok Sabha: लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच आपल्या सशस्त्र दलांनी कारवाई केली आणि नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक ठार झाले.

लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शूर सैनिकांच्या शौर्याला सलाम करत ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत सविस्तर माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेत चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी असे म्हटले की, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. याहल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं या मोहिमेतंर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट हवाई हल्ला करून चोख प्रत्युत्तर भारताकडून देण्यात आलं.

पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर आपल्या सशस्त्र दलांनी अचून निशाणा साधला. या लष्करी कारवाईत शंभराहून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि सहकारी मारले गेल्याचा अंदाज आहे. यापैकी बहुतेक जण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.

Published on: Jul 28, 2025 02:59 PM