Petrol- Diesel Price Hike | 10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला नवा उच्चांक तर, नविन दर काय?
इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा इंधन दरात वाढ करण्यात आली असून आज सकाळी 6 वाजल्यापासून नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांची तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ असून त्यामुळे महागाईचा ताण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे होर्मुज खाडीतील परिस्थिती गंभीर बनली आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून जागतिक बाजारात तेलाच्या किमती सतत वाढत आहेत. त्याचाच थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केल्याची चर्चा आहे. तसेच परदेश दौरे टाळण्याचाही सल्ला देण्यात आल्याचं बोललं जात आहे. एलपीजी गॅस पुरवठ्यावरही ताण निर्माण झाल्याची माहिती समोर येत असून परिस्थितीवर केंद्र सरकारकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.