AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi :  षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही... दिल्ली स्फोट घटनेनंतर मोदींचा भूतानमधून थेट इशारा

PM Modi : षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही… दिल्ली स्फोट घटनेनंतर मोदींचा भूतानमधून थेट इशारा

| Updated on: Nov 11, 2025 | 4:00 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधील जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाला संबोधित केले. त्यांनी षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही असे नमूद करत, भारत-भूतान संबंधांची ताकद अधोरेखित केली. वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनः या भारतीय भावनांचा उल्लेख करत, त्यांनी बुद्धांच्या अवशेषांचे दर्शन आणि भूतानच्या चौथ्या राजांच्या वाढदिवसाचा सोहळाही अनुभवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमध्ये आयोजित जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही. दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा देणार, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट इशारा दिला आहे. षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही आणि जबाबदार व्यक्तींना न्याय मिळवून दिला जाईल, असे स्पष्ट केले.

भूतानचे हिज मॅजेस्टी द फोर्थ किंग यांच्या ७० व्या वाढदिवसाचे साक्षीदार होण्याचा प्रसंगही या वेळी होता. पंतप्रधान मोदींनी भारत आणि भूतानच्या मजबूत संबंधांचे कौतुक केले. त्यांनी भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम आणि सर्वे भवन्तु सुखिनः या मूल्यांवर प्रकाश टाकला. संपूर्ण विश्व एक कुटुंब असून सर्वजण सुखी राहोत, अशी प्रार्थना नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच, वडनगर आणि वाराणसी या त्यांच्या जीवनातील बौद्ध परंपरेशी जोडलेल्या स्थानांचा उल्लेख केला. शांतीचा दिवा भूतानसह संपूर्ण जगाला प्रकाशमान करो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Published on: Nov 11, 2025 04:00 PM