PM Modi : इस बार बड़ा करेंगे… ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, पहलगाम हल्ल्यानंतर सौदीतच ठरवलं अन्…
पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान ताबडतोब भारतात परतले. पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्यासाठी सौदी अरेबियामध्येच एक रोडमॅप तयार केला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ४५ गुप्त बैठका घेतल्या असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच घेतला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसए, सीडीएस, लष्करी अधिकारी यांच्या सोबत या गुप्त बैठका केल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियामध्ये होते. या दौऱ्यावर असतानाच पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करेल, असा निर्णय पंतप्रधानांनी सौदी अरेबियातच घेतला होता. तर पंतप्रधानांनी सिंदूर ऑपरेशन आधीच ठरवले होते की यावेळी ते काहीतरी मोठं करायचं, ज्याचा उद्देश भारताकडून पाकिस्तान आणि जगाला संदेश देणे हा होता, असेही सूत्रांकडून समजतेय.