Michael Rubin : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् युद्धबंदीची याचना…
रुबिन यांनी तीव्र टीका करता असं म्हटलं की, 'या चार दिवसांच्या युद्धात, पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती जो युद्धबंदीची याचना करण्यासाठी आपल्या पायांमध्ये शेपूट घालून धावत होता. पाकिस्तान आता हा पराभव कोणत्याही प्रकारे लपवू शकत नाही. त्यांनी पराभव वाईटरित्या स्वीकारला आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली असल्याचे वक्तव्य अमेरिकेकडून करण्यात आलंय. इतकंच नाहीतर युद्धबंदीची याचना करण्यासाठी पाकिस्तान पायात शेपूट घालून धावत होता, असंही अमेरिकेने म्हटलं आहे. पाकिस्तानवर निशाणा साधताना अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबीन यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या भारतीय लष्कराच्या कामगिरीचं कौतुक केले आहे तर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला असल्याचे पाहायला मिळाले.
मायकल रुबिन यांनी असे म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानला राजनैतिक आणि लष्करी आघाड्यांवर दारुण पराभव पत्करावा लागला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मायकल रुबिन यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आणि भारताने केलेल्या लष्करी कारवाईचे कौतुक केले.

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गर्दी; हजारो भाविकांनी घेतलं दर्शन

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
