Ahmedabad Plane Crash : पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या नातेवाईकांना भेटले
PM Modi Visit Ahmedabad : अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ आपघातस्थळी जाऊन पाहणी केली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. यात तब्बल 241 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं त्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात देखील अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य बघता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत. याठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी पहिले अपघात झाला त्य ठिकाणी भेट देऊन पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या आणि जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे. तसंच या घटनेतील एकमेव वाचलेल्या प्रवाशाची देखील भेट घेऊन विचारपूस केली आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

