PM MODI : ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट… म्हणाले देशाचं सामर्थ्य
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताच्या पराक्रमी सेना आणि सशस्त्र दल, आपल्या गुप्तचर एजन्सी, संशोधकांचं कौतुक केलं.
‘आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना आणि सशस्त्र दल, आपल्या गुप्तचर एजन्सी, संशोधक प्रत्येक भारतवासियांकडून सॅल्यूट करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असिम शौर्य दाखवलं. मी त्यांच्या शौर्य, साहस, पराक्रमाला आज समर्पित करत आहे.’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं. आपल्या देशाच्या मातांना, बहिणींना आणि देशाच्या प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर २२ एप्रिल रोजी पहलगाम रोजी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, त्याने देश आणि जगाला हादरवलं होतं. सुट्टी घालवणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारून कुटुंबासमोर, मुलांच्यासमोर बेरहमीने मारणं हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता. क्रुरता होती. देशाच्या सद्भवाला तोडण्याचा हा प्रयत्न होता. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या ही पीडा मोठी होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले

विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...

दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला

कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
