Asim Munir : ऑपरेशन सिंदूरची इतकी धास्ती, असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
Operation Sindoor Asim Munir News : जेव्हा पाकिस्तानमधील नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्रांचा हल्ला होत होता, तेव्हा पाकिस्तानच्या लष्करप्रमुख असीम मुनीर याने असे काही केले की तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरबद्दल अशी एक बातमी समोर आली आहे की जी जाणून सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्याची लाज वाटेल. भारताकडून पाकिस्तानवर हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा बंकरमध्ये लपून बसला होता अशी माहिती समोर येत आहे. भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकदरम्यान पाकिस्तानातील नूर खान एअरबेस उद्ध्वस्त करून टाकण्यात आलं होतं. या हल्ल्यावेळी असीम मुनीर तिथेच होता आणि तो घाबरून एका बंकरमध्ये लपलेला असल्याचे सांगितले जात आहे. भारताविरुद्ध वारंवार विष ओकणारा असीम मुनीर याने भारतीय हल्ल्यादरम्यान भारतीय क्षेपणास्त्रांच्या भीतीने स्वतःला एका बंकरमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. जेव्हा पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता, तेव्हा असीम मुनीरला दोन तास बंकरमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.