PM MODI : Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर… पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
' बहावलपूर आणि मुरीदके सारखे दहशतीवाद्यांचे अड्डे ग्लोबल टेररिझमची युनिव्हर्सिटी होती. जगात कोणतेही मोठे अतिरेकी हल्ले झाले.', असे मोदी म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, सर्व पक्ष एका सुरात दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाईसाठी एकजूट राहिला. आपण दहशतवाद्यांना मातीत घालण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सुट दिली. आज प्रत्येक दहशतवादी, दहतवाद्यांचं प्रत्येक संघटनेला कळून चुकलंय की, आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही. ते देशाच्या कोटी कोटी लोकांची भावनाचं प्रतिबिंब आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर ऑपरेशन सिंदूर न्यायची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा, ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलेलं पाहिलं आहे. भारताच्या सैन्याने पाकिस्तानातील आतंकाच्या अड्ड्यावर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर अचूक प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, भारत एवढा मोठा निर्णय घेईल. पण जेव्हा देश एकजूट होतो, नेशन फर्स्टच्या भावनेने भारलेला असतो. राष्ट्र प्रथम असतं तेव्हा फोलादी निर्णय घेतले जातात. परिणाम आणले जातात. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारताच्या मिसाईलने हल्ला केला, ड्रोनने हल्ला केला, तेव्हा दहशतवाद्यांच्या इमारतीच नव्हे तर त्यांचं आवसानही गळालं, असं मोदी म्हणाले.

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..

सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय

VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
