पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभा
बंजारा सामाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे आजा पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे . या सभेसाठी पहाटेपासूनच लोकांची मोठी गर्दी होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान हे आज वाशिमसह ठाणे, नवी मुंबईतही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसेच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
बंजारा सामाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे आजा पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे . या सभेसाठी पहाटेपासूनच लोकांची मोठी गर्दी होत आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर शेजारील अनेक परिसरातून बंजारा समाजाचे बांधव हे सभास्थळी दाखल झाले आहेत. बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या सभेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक लोकं येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी चोख सुरक्षा व्यवस्था असून कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

