AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold | पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची मोठी प्रतिक्रिया, सोनं खरेदी बंद केल्यास....

Gold | पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची मोठी प्रतिक्रिया, सोनं खरेदी बंद केल्यास….

| Updated on: May 11, 2026 | 10:53 AM
Share

अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसह सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असून, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहनही केलं. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांचं वक्तव्य राष्ट्रहितासाठी योग्य असलं, तरी सोनं खरेदी पूर्णपणे बंद करणं शक्य वाटत नाही,” असं त्यांनी म्हटलं.
राजेश रोकडे यांनी सांगितले की, ज्वेलरी उद्योगाचा देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 7 टक्के वाटा आहे. या क्षेत्रात 70 लाख ते 1 कोटी कारागीर कार्यरत असून, सोन्याच्या व्यवसायावर अनेक जोडधंदेही अवलंबून आहेत. “सोनं खरेदी बंद झाल्यास मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढू शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

Published on: May 11, 2026 10:53 AM
Follow Us