Special Report | Uddhav Thackeray यांच्या सभेआधीच ‘पोस्टर’वॉर, हिंदुत्वावरुन ललकार

घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, अशा असंख्य टॅग लाईनही शिवसेनेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्धव ठाकरे उद्या कुणावर तोफ डागणार? याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 13, 2022 | 9:44 PM

बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे. या सभेचे तीन टीझर लॉन्च करण्यात आले आहेत. तसेच या तिन्ही टीझरमध्ये फक्त आणि फक्त हिंदुत्वावरच फोकस करण्यात आला आहे. त्यामुळे उद्याच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणात हिंदुत्वावरच अधिक भाष्य केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच शिवसेनेने पोस्टरबाजीही सुरू केली आहे. घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व, अशा असंख्य टॅग लाईनही शिवसेनेने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्धव ठाकरे उद्या कुणावर तोफ डागणार? याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें