माजी नगरसेवक समाधान सरवणकर-स्थानिकामंध्ये वाद! व्हिडीओ आला समोर
प्रभादेवी येथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या तात्पुरत्या शाखेसमोर उभारण्यात येत असलेल्या शेडला स्थानिकांनी विरोध केला. आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली, ज्यामुळे सरवणकर यांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली.
प्रभादेवी येथे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक नागरिकांमध्ये शाखेच्या शेडवरून मोठा वाद झाल्याचे समोर आले आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेसमोर कायमस्वरूपी शेड बांधण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रयत्नांना प्रभादेवीतील साई सुंदर नगर येथील स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, हे शेड उभारल्यास आपत्कालीन परिस्थितीत ये-जा करण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. याच मुद्द्यावरून स्थानिकांनी विरोध करत घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक समाधान सरवणकर स्वतः घटनास्थळी पोहोचले, परंतु त्यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. तीव्र विरोधामुळे समाधान सरवणकर यांना अखेर घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. हा वाद तात्पुरत्या शाखेच्या शेडच्या बांधकामावरून सुरू झाला असून, स्थानिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव याला विरोध केला आहे.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज

