Bachchu Kadu : प्रस्थापितांची झोप उडेल, दिल्लीचा थरकाप उडेल; ठाकरे बंधूंच्या मोर्चाला बच्चू कडूंचा पाठिंबा
प्रहारच्या बच्चू कडू यांनी ठाकरे बंधूंना आपला पाठिंबा दर्शवला आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे.
सरकारच्या हिंदी भाषा सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी छेडलेल्या लढाईला आता प्रहारच्या बच्चू कडू यांनी देखील पाठिंबा दिला आहे. माय मराठीच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक ट्विट देखील केलं आहे. यात त्यांनी म्हंटलं आहे की, प्रस्थापितांची झोप उडेल, दिल्लीचाही थरकाप उडेल. असा हा लढा महाराष्ट्र लढतोय! माय मराठीच्या स्वातंत्र्याचा! मायबाप शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा! भाषा, भूमी, शेतकरी, कष्टकरी.. महाराष्ट्रासाठी लढणारा आवाज आणखी बुलंद होतं आहे. मराठीच्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. तो असलाच पाहिजे. असं कडू यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या लढ्याला प्रहारची देखील साथ मिळणार असल्याचं दिसून येत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

