VIDEO : Pravin Darekar | विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकरांना उमेदवारी जाहीर
10 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात होत आहेत. या निवडणुकीत भाजप 5 जागा लढवणार आहे. प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे,श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिलीये. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
10 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात होत आहेत. या निवडणुकीत भाजप 5 जागा लढवणार आहे. प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, राम शिंदे,श्रीकांत भारतीय यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिलीये. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. विधानपरिषदेसाठी प्रविण दरेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दरेकरांनी सिध्दीविनायक मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे. उमा खापरे या भाजपाच्या जुन्या नेत्या आहेत. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

