‘शरद पवारांनी जर आदेश दिला तर…,’ सातारा लोकसभेबद्दल पृथ्वीबाबाचं मोठ वक्तव्यं
सातारा हा मतदार संघ महत्वाचा असून त्यावर अजून उमेदवारी निश्चित न झाल्याने उत्सुकता वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने सातारा मतदार संघासाठी अजूनही कोणाचे नाव घेतलेले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु असून त्यांनी याबाबत आपले मत मांडले आहे.
लोकसभा निवडणूकीतील काही जागांवर अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याने या जागांवर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून कोण निवडणूक लढविणार याविषयी उत्सुकता ताणली आहे. या जागी महायुतीतून उदयनराजे भोसले यांचे नाव असले तरी त्याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. हा मतदार संघ महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला हवा आहे. तर उदयन राजेंना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचे नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून श्रीनिवास पाटील यांनी आजारपणामुळे नकार दिला आहे. त्यामुळे याविषयी दोन्ही बाजूने उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात आता कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे त्यामुळे शरद पवारांना सक्षम उमेदवार जाहीर करावा लागेल. शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत जातीयवादी विचार येणार नाहीत, यासाठी शरद पवार आणि आम्ही कटीबद्ध आहोत, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.