रामदास कदमांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, पुण्यात जोडेमारो आंदोलन

रामदास कदम यांच्याविरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.  पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने रामदास कदम यांचा निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले.

अजय देशपांडे

|

Sep 21, 2022 | 1:09 PM

पुणे : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) केलेलं वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांच्याविरोधात आता शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.  पुण्यात शिवसैनिकांच्या वतीने रामदास कदम यांचा निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी कदमांच्या पोस्टरला जोडे मारत आपला निषेध व्यक्त केला.  या आंदोलनाला महिला शिवसैनिकांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.  रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा आता शिवसैनिकांकडून जोरदार समाचार घेण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये देखील शिवसैनिकांच्या वतीने रामदास कदम यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें