Pune Crime : गौरव आहुजाला एका दिवसाची पोलीस कोठडी
Pune Yerwada Crime News : मद्यपान करून भरचौकात अश्लील चाळे केल्या प्रकरणी आरोपी असलेल्या गौरव अहुजा याला आज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
पुणे अश्लीलचाळे प्रकरणातील आरोपी गौरव अहुजा याला कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यात येरवडा चौकात मद्यपान करून अश्लील चाळे करण्याचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यात गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल हे दोघं भररस्त्यात महिलांसमोर अश्लील चाळे करत होते. त्यानंतर येरवडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर गौरव अहुजा याने माफी देखील मागितली आहे. आज पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अहुजाची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी देखील करण्यात आलेली आहे. या चाचणीत त्याच्या शरीरात माद्याचं प्रमाण देखील आढळून आलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

