EVM ला दोष देण्यात काही अर्थ नाही!; विरोधीपक्षाचा ईव्हीएमला विरोध, अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया
Ajit Pawar on EVM Machine : निवडणुकीचा अंदाज सांगणारा मी कुणी ज्योतिषी नाही. लोकांच्या समोर जाण्यासाठी निवडणुकीची रणनीती असते. कोण कुठलं बटण दाबणार आहे हे एक्युरेट सांगणारा अजून जन्माला यायचा आहे. 2024 मध्ये परिवर्तन होईलच, असं अजित पवार म्हणालेत.
पुणे : एखाद्या निवडणुकीत उमेदवार हरल्यास विरोधकांकडून अनेकदा ईव्हीएमला दोष देण्यात येतो. भाजपकडून ईव्हीएममध्ये अफरातफर केल्याचं बोललं जातं. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही,असं माझं वैयक्तिक मत आहे. जर ईव्हीएममध्ये गडबड असती तर पंजाबमध्ये आप आलं नसतं. केरळमध्ये डावे आले नसते. पराभव झाला की ईव्हीएमला दोष द्यायचा आणि विजय झाला सगळं आलबेल आहे असं म्हणायचं हे बरोबर नाही”, असं अजित पवार म्हणालेत. अजित पवार आज पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटनाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवरही आपलं मत मांडलं.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

