Pune Unseasonal Rain : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी
Pune rain news : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पुण्यातील कोंढवा, कात्रज भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण देखील बघायला मिळालं आहे. हवामान खात्याकडून पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.
राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे. आज सकाळपासूनच पुण्यात देखील अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळाला आहे. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे पुणेकरांची चांगलीच फजिती झाली. पुण्यातील कोंढवा, कात्रज, हडपसर, स्वारगेट भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज दुपारनंतर पुण्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.