Pune Unseasonal Rain : पुण्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू, राज्यात अवकाळीचा कहर
Unseasonal Rain In Maharashtra : अवकाळी पावसाने राज्यात चांगलीच दणादान केलेली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना आणि फलबागांना मोठं नुकसान झालं आहे.
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. पुणे शहराला देखील पावसाचा ‘यलो’ अलर्ट, तर जिल्ह्याला ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर आज पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यातील स्वारगेट, फातिमानगर, हडपसर आणि शिवाजीनगर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.
राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच फजिती झालेली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर या अवकाळी पावसाचा फटका शेतीला देखील बसलेला आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांसह फलबागांना देखील या पावसाने फटका बसलेला आहे. केळी, डाळिंब, आंबा, द्राक्ष बागांचं या पावसाने मोठं नुकसान झालं आहे.