Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांची आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची रणनीती या बैठकीत ठरणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद होणार असून, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीत राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या खासदारांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना चहापानासाठी निमंत्रित केले असून, या बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. दुपारी ४ वाजता या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे प्रमुख नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. संजय राऊत आणि प्रियांका गांधींसह इतर खासदारही उपस्थित राहणार आहेत. काल सुप्रीम कोर्टापर्यंत काढण्यात आलेल्या मार्चनंतर आणि राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर आता पुढची दिशा ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलीस, आयटीबीपी आणि सेवादलचे जवान मोठ्या संख्येने तैनात असून, प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. परिसरातील प्रत्येक हालचालीवर कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
