Rain Update: मुंबई, कोकण, पालघरमध्ये मुसळधार पाऊस, राज्यात ठिकठिकाणी NDRF च्या टीम तैनात

मुंबई, पालघर आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jul 05, 2022 | 1:58 PM

मुंबई, पालघर आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत. कोल्हापूर, नांदेड आणि गडचिरोलीमध्येसुद्धा एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. संपूर्ण कोकण विभागात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून काही भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नद्या दुथडी भरून वाहत असून महाड आणि चिपळूण या शहरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक आहे. महाड शहरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें