कोकणात पावसाचा जोर कायम; 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर
आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीच्या वाशिष्टी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परशुराम घाट देखील खबरदारी म्हणून पुढील आठ दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. आतापर्यंत कोकणातील सुमारे 35 हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. डोंगरी भाग, नदी किनाऱ्यालगतच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे.
Latest Videos