राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका

राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका

| Updated on: Oct 28, 2026 | 8:22 PM

५० खोके एकदम ओके या घोषणेवरून राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ५० खोके म्हणजे ५० कोटी आणि ४० आमदारांसाठी २००० कोटी रुपये, असे गणित मांडत त्यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठे परिणाम होतील, असा इशारा दिला आहे.

राज ठाकरेंनी कर्जत-भीमाशंकर येथील सभेत ५० खोके एकदम ओके या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकारणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही उपस्थित असलेल्या या सभेत, ५० खोके एकदम ओकेच्या घोषणांवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. लोकांना बोलताना आपण काय बोलतोय, याचे भान असले पाहिजे, असे ते म्हणाले. राज ठाकरेंनी ५० खोकेचा अर्थ स्पष्ट करत म्हटले की, ५० खोके म्हणजे ५० कोटी रुपये होतात. जर शिवसेनेचे ४० आमदार फोडले असतील, तर याचा अर्थ २००० कोटी रुपये झाले.

“२००० कोटी आले कुठून? काय चाललंय महाराष्ट्रात याचा आपल्याला अंदाज आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण या सगळ्या गोष्टी हसण्यावर नेतोय, पण याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिला. राज ठाकरे म्हणाले की, भविष्यात तुमची मुले तुम्हालाच दोष देतील की, जेव्हा महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होते, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केले. केवळ आजच्या परिस्थितीवर न थांबता, पुढे काय होणार आहे याचा अंदाज आजच लावा, नाहीतर तुमचेच आयुष्य हराम होईल, असे गंभीर वक्तव्य त्यांनी केले.

Published on: Oct 28, 2026 8:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us