Raj Thackeray : राज ठाकरेंची पुण्यात सभा? आज सभेची तारीख जाहीर करणार

पुण्यात राज ठाकरे पुढच्या आठवड्यात सभा घेणार? पुण्यात टार्गेट कोण असणार? असा सवाल विचारण्यात येत आहे.

प्रदीप कापसे

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 19, 2022 | 11:11 AM

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सभेपाठोपाठ सभा घेत राज्यात रान पेटवलं आहे. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरेंची पहिली सभा गुढी पाडव्याला शिवतिर्थावर झाली. पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलतना त्यांनी गुढी पाडव्याची सभा ही हीट ठरणार असे संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे शिवतिर्थावर बोलायला उभे राहिले. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका उचलून धर मशीदीवरील (Loudspeaker Row) भोंग्यांविरोधात रणशिंग फुकलं. त्यानंतर राज्यातलं संपूर्ण राजकारण ढवळून निघलं. राज ठाकरे या एकाच सभेवर थांबले नाहीत. तर काही दिवसातच राज ठाकरेंनी लगेच विरोधकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात सभा घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद आणि आता पुण्यात राज ठाकरे सभा घेणार का, असाही सवाल आहे. दरम्यान, सभेसंदर्भात आज अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें