‘हिंदुत्वाबरोबरच मराठीचा मुद्दा जोरकसपणे लावून धरा’; Raj Thackeray यांचे MNS कार्यकर्त्यांना आदेश
महापालिका निवडणुका (bmc) लांबणवीर गेल्या असल्या तरी मनसेने (mns) मात्र या निवडणुकांसाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महापालिका निवडणुका (bmc) लांबणवीर गेल्या असल्या तरी मनसेने (mns) मात्र या निवडणुकांसाठीची जय्यत तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा प्रखरपणे लावून धरण्याचे आदेश दिले. हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाही. पण मराठीचा मुद्दाही जोरकसपणे मांडा. हिंदुत्वाबरोबरच मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशा सूचनाच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या. मराठीबाबत फक्त काही ठरावीक नेत्यांनी न बोलता सर्वांनीच त्यावर बोललं पाहिजे, अशा कानपिचक्याही राज यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. शिवसेनेकडून मराठीचा मुद्दा सुटल्याचं चित्रं असतानाच राज ठाकरे यांनी निवडणुकीची संधी साधून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. येणाऱ्या काळात मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत असून निवडणुकीचा प्रचारही मराठी आणि हिंदुत्वाच्या भोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

