Thackeray : ठाकरे ब्रँड टिकणार? राज-उद्धव यांची युती व्हावी की नाही? मनसे पदाधिकाऱ्यांची इच्छा काय?
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंसोबत युती कधी करणार या प्रश्नावर बोलताना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. ते होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले
ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे, अशी इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीत ठाकरे ब्रँड कायम टिकायला हवा अशी इच्छा व्यक्त केली. दोन पक्षांमध्ये युतीसंदर्भात जर बोलणं सुरू असेल तर ती चांगली गोष्ट आहे, असं मनसे पदाधिकाऱ्यांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्यात. यामध्ये ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. अशातच दोघांकडून यावर भाष्य केलं जात असल्याने भविष्यात युती होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...

मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश

हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज

एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
