MNS Raj Thackeray : ‘.. अशा राजकीय फेरीवाल्यांनी ज्या फुटपाथवर जायचं तिथे जावं’, राज ठाकरेंकडून कानउघडणी
Raj Thackeray Speech: मनसेच्या 19व्या वर्धापनदिनानिमित्त आज चिंचवडमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कऱ्याकर्त्यांची कानउघडणी केली.
फेरिवाले असतात, कष्ट करतात. पण हे राजकीय फेरिवाले आले ना, असे फेरिवाले माझ्या पक्षात नाही. आज या फुटपाथवर, तिकडून कोणी डोळा मारला तर त्या फुटपाथवर, आपल्याला बांधायचं तर खणखणीत दुकान बांधू, फेरिवाले नाही होणार, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. आज चिंचवडमध्ये मनसेचा 19 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. आज पक्षाला १९ वर्ष झाली. ही १९ वर्ष कशी गेली. काय गेली. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलाय अरे यांचे आमदार येऊन गेले, खासदारकीला एवढी मते मिळाली तरी या पक्षातील लोक एकत्र कशी काय राहतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण राजकीय फेरीवाले आपल्याला उभे करायचे नाही, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपली पक्ष संघटना सर्व ठिकाणी आहे. पण ती मजबूत करणं जास्त गरजेचं आहे. गटाध्यक्षाच्या घरच्यांनाही वाटलं पाहिजे माझ्या मुलाची काळजी घेतात. त्याच्याशी कोण तरी बोलतंय. मी त्याला आकार दिला. मी एक गोष्ट लिहून आणली. ती अख्खी नाही. इथे सर्व बसलेले आहेत. माझ्यासकट, प्रत्येकाचं काम काय असणार, ते दर १५ दिवसाला तपासलं जाणार. जर महिना दीड महिन्यात असं जाणवलं, हा पदाधिकारी. तो कोणी का असेना, मला त्याच्यात कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही. आता सांगून ठेवतो. त्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल तिथे बसावं त्याने. ती गोष्ट यापुढे होणार नाही.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
