उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष तयारी, बेड नेते भेटीला पोहोचले

| Updated on: Jul 27, 2026 | 1:26 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक सोशल मीडियासह प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देत आहेत. यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर विशेष हालचाली दिसून येत असून अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे कार्यकर्त्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे. संजय राऊतांनी देखील ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच ये-जा सुरू आहे. पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा संदेशांसह अनेक जण उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दाखल होत आहेत.

राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे. या भेटीत केवळ वाढदिवसाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण होणार की इतर विषयांवरही चर्चा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Published on: Jul 27, 2026 1:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us