Thackeray Brothers Reunion : ठाकरे बंधूंचं मनोमिलन आता नातेवाईक घडवून आणणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा आता जोर धरत आहेत. याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांमध्ये आता नातेवाईकांची देखील एंट्री झाल्याचं बघायला मिळत आहे. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युतीबद्दल अद्यापही कोणताच थेट संवाद झालेला नाही. कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे बंधु गेल्या काही महिन्यात अनेकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे.
राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. या बाबत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दोन्ही नेत्यांनी युतीबाबत एकमेकांशी संवाद साधावा असं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वाटत आहे. मात्र ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणटचं थेट बोलणं झालेलं नाही. परंतु दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून युतीबद्दल संवाद सुरू झाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

