Rajnath Singh : आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो – राजनाथ सिंह
Rajnath Singh on Pakistan Terrorism : दहशतवादी मसूद अझरला पाकिस्तानने 14 कोटी रुपये दिले आहेत, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज म्हंटलं आहे.
आयएमएफकडून मिळालेला पैसा पाकिस्तान टेरर फंडिंगसाठी वापरतो. दहशतवादी मसूद अझरला पाकिस्तानने 14 कोटी रुपये दिले आहेत, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हंटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुजरातमधील भूज हवाई दल तळाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना राजनाथ सिंग म्हणाले की, पाकिस्तानमधील अण्वस्त्र चुकीच्या हातांमध्ये आहे. पाकिस्तानमधील अण्वस्त्र जगासाठी धोका आहेत. पाकिस्तानातील सरकार सामान्य नागरिकांकडून गोळा केलेला कर जैश-ए-मोहोम्मदचा आका मसुद अझरच्या हाती देणार आहे. पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथे असलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधा पुन्हा स्थापित करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे, असंही राजनाथ सिंग यांनी सांगितलं आहे.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

