माझ्या पत्नीच्या नावाने 1990 पासून सावली बार, पण..; रामदास कदम यांची मोठा खुलासा
अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांवर आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. योगेश कदम यांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डांसबार असल्याचा आरोप परब यांनी केला आहे. तर हे राजकारण सुरू असून माझा काहीही संबंध नाही असं म्हणत योगेश कदम यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तर माहिती द्या, तथ्य असेल तर चौकशी करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर म्हंटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणी आता शिंदेंच्या सेनेचे नेते रामदास कदम यांनी टीव्ही 9 मराठीशी या संदर्भात बातचीत केली आहे. यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. आपल्या मालकाला म्हणजे उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी रामदास कदम यांना कुठे बदनाम करता येतं का असा बालिश प्रयत्न विधिमंडळाचा आधार घेऊन करणं सुरू आहे. काल अनिल परब यांनी चुकीचे नियम दाखवून विधीमंडळात सभापतींची दिशाभूल केली, त्याबाबत मी सभापतींना पत्र लिहिलं आहे. ज्या हॉटेलबद्दल हे आरोप परब यांनी केले. त्याची मी स्वत: माहिती घेतली. त्या ठिकाणी कोणताही डान्सबार नव्हता. फक्त ऑरकेस्ट्रा होता. आणि ऑरकेस्ट्राचा परवाना आहे त्यांच्याकडे, असा खुलासा कदम यांनी केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

