खंडणीबहाद्दरांचा कारनामा; मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणीची मागणी
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने संदीप पाटील, शेखर ताकवणे या दोघांनी खंडणी मागितली. या संबंधी बांधकाम व्यवसायिक राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे
पुणे : खंडणीबहाद्दर खंडणी मागणीसाठी काय करतील याचा काही नेम नाही. आता तर खंडणी मागणीसाठी चक्क पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात सध्या जोरदार खलबळ उडाली आहे.
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने संदीप पाटील, शेखर ताकवणे या दोघांनी खंडणी मागितली. या संबंधी बांधकाम व्यवसायिक राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या, अशी मागणी खंडणी खोरांनी केली होती.
Published on: Mar 27, 2023 12:26 PM
Latest Videos
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

