Video : संजय राऊतांची सुरक्षित जागा संभाजीराजेंना संधी द्या- रावसाहेब दानवे 

राज्यसभेवर जायचं असेल तर हातात शिवबंधन बांधा, अशी ऑफर शिवसेनेकडून (shivsena) स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना देण्यात आली आहे. त्याला संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी नकार दिला आहे. त्यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. शिवसेनेला शिवबंधन बांधलेला माणूस लागतो. शिवबंधन बांधायचं आणि अडकवून टाकायचं हे त्यामागचं सूत्रं आहे. मग काय […]

आयेशा सय्यद

|

May 23, 2022 | 4:28 PM

राज्यसभेवर जायचं असेल तर हातात शिवबंधन बांधा, अशी ऑफर शिवसेनेकडून (shivsena) स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांना देण्यात आली आहे. त्याला संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी नकार दिला आहे. त्यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. शिवसेनेला शिवबंधन बांधलेला माणूस लागतो. शिवबंधन बांधायचं आणि अडकवून टाकायचं हे त्यामागचं सूत्रं आहे. मग काय करायचं तो निर्णय करायचा. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. सर्व पक्षांचा पाठिंबा असावा असं संभाजी राजेंना वाटतं. पण शिवसेनेचं म्हणणं की शिवबंधन बांधा. एकदा शिवबंधन बांधलं की अडकून टाकायचं. मग राजे निवडून येवो की न येवो. राजेंना शिवबंधन बांधायचं तर जी राऊतांची सेफ जागा आहे. ती त्यांना द्या. सहाव्या जागेवर राऊतांना पाठवा. संभाजी राजेंना अडकवायचं नसेल तर हे कराच. त्यांना राज्यसभेवर सन्मानपूर्वक त्यांना पाठवायचं असेल तर त्यांना फर्स्ट जागा द्या. तरच त्यांचा सन्मान होईल, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें