Dhangekar Audio Viral : मला गरिबाला काही बोलू नका भाऊ, तुमची भिती वाटते… धंगेकरांचा ‘तो’ फोन कॉल तुफान व्हायरल
रवींद्र धंगेकर आणि रमेश पाटील यांच्यातील कथित फोन कॉलची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या संवादात, रमेश पाटील यांनी धंगेकरांच्या कामाचे कौतुक करत ते चंद्रकांत पाटील यांनी करायला हवे होते असे म्हटले आहे.
सध्या महाराष्ट्रभर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि राजकीय नेते रमेश पाटील यांच्या कथित फोन संवादाची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये, रमेश पाटील यांनी धंगेकरांना फोन करून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. “धंगेकर, तुम्ही जे काम करताय ते चंद्रकांत पाटील यांनी करायला हवं होतं,” असे रमेश पाटील या संभाषणात म्हणताना ऐकू येत आहेत. रमेश पाटलांच्या या टिप्पणीनंतर, रवींद्र धंगेकर यांनी मिश्किलपणे आपली भीती व्यक्त केली.
धंगेकर म्हणाले, “नाही तुमची मला भीती वाटते म्हणून मी काय तुम्हाला रिप्लाय देत नाही भाऊ.” यावर रमेश पाटील यांनी धंगेकरांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करत “आई लव्ह यु भाऊ” असे म्हटले. धंगेकरांनी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते असल्याचे मान्य करत रमेश पाटील यांच्याकडून फोन येण्याची त्यांना अपेक्षा होती असेही नमूद केले. या क्लिपने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या ऑडिओची टीव्ही ९ पुष्टी करत नाही.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

