Ravindra Dhangekar Video : ‘जनतेच्या मनातील…’, रवींद्र धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं, पुण्यात बॅनरबाजी
रवींद्र धंगेकर हे जनतेच्या मनातील आमदार, अशा आशयाचे बॅनर्स रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून पुण्यात लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यातून धंगेकर यांच्या समर्थकांनी रासनेंवर निशाणा साधलाय
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी भाजपच्या हेमंत रासने यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. रवींद्र धंगेकर हे जनतेच्या मनातील आमदार, अशा आशयाचे बॅनर्स रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी पुण्यात लावल्याचे पाहायला मिळाले. रवींद्र धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त धंगेकर यांच्या समर्थकांनी हे बॅनर्स लावल्याची माहिती मिळतेय. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांचा पराभव करण्यात आला होता. दरम्यान, १२ मार्च रोजी रवींद्र धंगेकर यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त धंगेकर यांच्या समर्थकांकडून पुण्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर जनतेच्या मनातील आमदार रवींद्र हेमराज धंगेकर असा उल्लेख करण्यात आला होता. या बॅनरवर लावण्यात आलेल्या फोटोत रवींद्र धंगेकर हे भगवेमय दिसत आहे. रवींद्र धंगेकरांनी यामध्ये भगवी टोपी आणि भगवे उपरणे परिधान केल्याचे दिसतंय.